सातत्याने भासणाऱ्या तुटवडा व नवनवीन विषयाचा अभाव यामुळे अखिल भारतीय स्तरावर एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन संस्थेने सुरु केले.
पाचव्या वर्षी देशभरातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला व बऱ्याच लेखक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सदर लेखन स्पर्धेचा निकाल श्री सांस्कृतिक दालनाच्या सदस्यांच्या उपस्थितीत नुकताच जाहीर करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल लेखक व शहर
प्रथम क्रमांक –
अरविंद गोविंद लिमये हरिपूर,सांगली
एकांकिका :आनंदाच गणितं
द्वितीय क्रमांक-
उदय दत्तात्रय गोडबोले –
हरिपूर सांगली
एकांकीका – मेघा रे मेघा
तृतीय क्रमांक
मेधा मराठे –
बेळगांव
एकांकीका-मनातल्या भुतांची ऐशी शी की तैशी
सदर परिक्षणाचे काम श्री सुभाष सुंठणकर , श्री विनोद गायकवाड यांनी केले . संस्थेने एका पत्रकद्वारे या स्पर्धक व विजेत्यांचे अभिनंदन केले असून या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ एकांकिका स्पर्धेच्या बाक्षिस वितरणावेळी रविवार दि. 04 फेब्रुवारी रात्री 8 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.