बेळगांव :दीपावली सणाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने जवानांना फराळाचे वाटप करण्यात आले. एंजल फाउंडेशन आणि जय जवान जय किसान संघटनेचे गोविंद पाटील यांच्या सहकार्याने जवानांना वाटपचा कार्यक्रम पार पडला.
त्यांनी या फराळाचे आणि मिठाईचे वाटप कोब्रा कमांडो जवानांना केले. सर्वांची दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी व्हावी तसेच जे आपल्या घरापासून दूर राहतात त्यांना आपल्या घराची आठवण येऊ नये.
या करिता एंजल फाउंडेशनच्या वतीने मिठाई आणि फराळ जवानांना वितरित केले आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके आणि जय जवान जय किसान संघटनेचे गोविंद पाटील, यांच्या सहित सदस्य उपस्थित होते.