शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात एक दिवसाचे दंत व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विश्व भारत सेवा समिती बेळगावी चे सचिव श्री प्रकाश नंदीहळी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमास धर्मस्थळ ट्रस्ट बेळगावी चे डायरेक्टर श्री. सतीश नाईक हे मुख्य कार्यवाहक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच दंत चिकित्सक डॉक्टर प्रीती शेट्टी व नेत्र चिकित्सक डॉक्टर अभय दल्ली हे होते. त्याचबरोबर प्रोजेक्ट ऑफिसर मंजुनाथ सर खासबाग, श्रीमती चंद्रकला मॅडम ( वकुट अध्यक्षा), पंडित नेहरू महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक श्री के एल शिंदे इत्यादी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रा. श्रीमती स्मिता मुतगेकर यांनी पाहूण्याची ओळख व परिचय करून दिला.
कार्यक्रमास लाभलेले सतीश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी दातांची योग्य ती काळजी घ्यावी, दातांना दुर्गंधी का येते? दात का किडतात ? त्याबद्दलची माहिती सांगितली. तर दंत चिकित्सक डॉक्टर प्रीती मॅडम यांनी दात दुखीवर उपचार आणि खबरदारी बद्दल माहिती दिली. नेत्र चिकित्सक डॉक्टर अभय दल्ली यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, झोपेच्या स्थितीत अवस्थेत वाचन करू नये, मोबाईल टीव्ही जास्त जवळून बघू नये, असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात श्री प्रकाश नंदीहळी म्हणाले की आपले दात हे गिरणीचे काम करतात. खाल्लेल्या अन्न घटकाचे योग्य ते चर्वण झाले तरच पुढील क्रिया सुलभ व नीट नेटक्या होतात. दातांची निगा आपणच योग्य ती घेतली पाहिजेत व डोळे हा शरीराचा नाजूक अवयव असल्याने योग्य ती काळजी व निघा घेणे गरजेचे आहे असे म्हणाले.
शिबिरास जवळपास 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महिला धर्मस्थळ स्वसहाय संघाच्या श्रीमती चंद्रकाला मॅडम यांनी केले.
एक दिवशीय दंत व नेत्र तपासणी शिबिर संपन्न
![E21F12CF-9524-4C79-9D8F-778157E01804](https://belgaavkesari.in/wp-content/uploads/2023/11/E21F12CF-9524-4C79-9D8F-778157E01804-1068x801.jpeg)