खानापूर : खानापूर येथील शिव स्वराज जनकल्याण फाउंडेशनतर्फे लोकमान्य भवन येथे शुक्रवारपासून आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी शनिवारी व रविवारी अनेक शाळांनी विशेष सहलींचे नियोजन केले आहे त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
शिव स्वराज्य जनकल्याण फाउंडेशन खानापूर व दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबईतर्फे नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी येणाऱ्या काळात समाजाला संघटित करून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यासह उद्योग निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसेच तालुक्यातील युवकांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसेच तालुक्यातील विविध समस्यांबाबत सातत्याने आवाज उठविला जाणार आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले असून पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस जास्तीत जास्त शिवप्रेमीनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, समिती नेते गोपाळ पाटिल, आबासाहेब दळवी, मारुती परमेकर, जगनाथ बिर्जे आदि मान्यवर उस्थितीत होते. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष रमेश धबाले, खजिनदार मुकुंद पाटील, सचिव बाळासाहेब शेलार, सुनील पाटील, नागेश भोसले, रणजीत पाटील, मिलिंद देसाई, संतोष गुरव, रामचंद्र गावकर, संदेश कोडचवाडकर, प्रभू कदम, सुधिर नावलकर, विनोद पाटील आदी उपस्थित होते.
शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहून शिवप्रेमीत संचारला उत्साह, पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला प्रचंड गर्दी
![0A9B80E2-9571-4A91-B4FF-070A7618D83F](https://belgaavkesari.in/wp-content/uploads/2023/11/0A9B80E2-9571-4A91-B4FF-070A7618D83F-1068x601.jpeg)