बेळगाव शहरात अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा मुद्धा गंभीर झाला असून शहरात अवजड वाहनांना शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगावच्या पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
ऑगस्ट २०२२ मध्ये कॅम्प येथे अवजड वाहनाच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू झालेल्या दुःखद घटनेनंतर, पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले अन शाळेच्या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. दुर्दैवाने, आता शाळेच्या वेळेत पुन्हा एकदा अवजड वाहने बिनदिक्कतपणे धावत आहेत. यामुळे शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर तसेच प्रमुख चौकात आणि शाळां परिसरात गंभीर वाहतूक कोंडी होत आहे, यामुळे पालकांना तसेच सामान्य जनतेला मोठी गैरसोय आणि चिंता होत आहे. हे लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर यांनी पदाधिकाऱ्यां समवेत पोलीस आयुक्तांची भेट घेत, सकाळी ०८:०० ते १०:३० शाळा भरण्याच्या वेळेत व दुपारी ०३:०० ते संध्याकाळी ०६:०० शाळा सुटण्याच्या दरम्यान शहरात अवजड वाहनांना निर्बंध करावेत अशी मागणी केली. पोलीस आयुक्तांनी याप्रश्नी आवश्यक पावले उचलली जातील असे आश्वासन युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे,ॲड. वैभव कुट्रे, शेखर तळवार, शांताराम होसुरकर, सुरज चव्हाण, ॲड अश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.
शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवा : युवा समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन
