बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे 19 वी जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा 2025 व निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा रोड व रिंक अश्या प्रकारात घेण्यात आली रोड स्पर्धा मालिनी सिटी येडियुरप्पा मार्ग ओल्ड पी बी रोड येथे घेण्यात आली तर रिंक स्पर्धा शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंकवर घेण्यात आली या स्पर्धेमध्ये बेळगांव जिल्हातून सुमारे 150 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे समाजसेवक व बसवेश्वर बँक चे अध्यक्ष श्री सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येल्लूरकर, सुरज शिंदे, स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी श्री पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यांनतर त्यांनी सर्व मुलांना प्रोत्साहन देत लवकरच बेळगांव सिटी मध्ये सुसज्ज असे मोठे स्केटिंग ट्रॅक व इतर स्पोर्ट्स साठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन दिले वरील स्पर्धा व निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसने विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, सागर तरळेकर, ऋषीकेश पसारे, स्वरूप पाटील या सर्वांनी भरपूर परिश्रम घेतले
19 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा आणि निवड चाचणी उत्साहात पार
By Akshata Naik

Next articleबेळगाव ब्रेकिंग