शुभम शेळके यांनी कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांच्याविरुद्ध प्रतिक्रिया दिल्याने आज कर्नाटक पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी घरी जाऊन अटक करून घेतले शुभम शेळके यांना ताब्यात
सीमाभागातील मराठी भाषिक जनता १ नोव्हेंबर रोजी आपली लोकेच्छा व्यक्त करत असते. झालेल्या अन्यायाविरोधात आमचा लढा आहे. राज्योत्सवाला आम्ही विरोध करत नाही. पण, कन्नड संघटनेचा एक नेता बेळगावात येऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला प्रशासनाने वेळीच रोखावे. अन्यथा मराठी जनता त्याला जशास तसे उत्तर देईल, असा इशारा म. ए. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सोशल मीडिया वर दिला असल्याने आज माळ मारुती पोलिसांनी शुभम शेळके यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शुभम शेळके यांना एक न्याय आणि नारायण गौडा यांना एक न्याय कर्नाटक पोलीस देत असल्याने सीमाभागत संताप व्यक्त होतोय.