कामधेनू अय्यप्प सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात सुमारे ३० उत्साही सदस्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. त्यापैकी १८ सदस्यांनी यशस्वीरित्या रक्तदान केले, तर काही जणांना आरोग्य कारणामुळे रक्तदान करणे शक्य झाले नाही, तरीही त्यांच्या प्रयत्नांचे आणि इच्छाशक्तीचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व दात्यांचे आणि सहभागींचे आभार मानले तसेच समाजहिताच्या अशा उपक्रमांना भविष्यातही पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.