पोलिस आयुक्त (CP) भुषण बोरसे यांनी नुकतीच बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली येथील श्रीच्या मंडपात मंडळाच्या प्रतिनिधींना भेट देऊन गणपती बाप्पाच्या तयारीचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या भेटीदरम्यान उत्सवाच्या सुरक्षित व सुरळीत आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांनी ‘ त्यांचे स्वागत केले.
यानंतर पोलीस आयुक्त भुषण बोरसे म्हणाले, “बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. वातावरण उत्साही आहे. आपण सर्वांनी हा उत्सव साजरा केला पाहिजे परंतु आपण नियमांचे पालन देखील केले पाहिजे, जे खूप महत्वाचे आहे.”
तसेच गणेशोत्सव हा बेळगावातील सर्वात लोकप्रिय उत्सव आहे. बेळगाव शहर आणि इतर ठिकाणी विविध मंडळांनी उभारलेले मंडप 10 दिवसांच्या या उत्सवात हजारो भाविकांना आकर्षित करतात.म्हणून आम्ही पोलीस खात्याकडून बेळगावच्या शांततेचा व सुरक्षिततेचा विचार करून आम्ही काही निर्णय घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाने आखलेल्या नियोजनाची माहितीही यावेळी देण्यात आली. “30मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेत आयुक्तांनी आगामी गणेशोत्सवाबाबत आमचे मत सुध्दा जाणून घेतले. यानंतर बेळगावचा राजाचे कार्याध्यक्ष सुनील जाधव यांनी पोलिस आयुक्तांना आश्वासन दिले की कर्नाटक सरकारच्या सर्व आदेशांचे पालन आमच्या मंडळातील पदाधिकारी करतील आणि जर का यावेळी आम्हाला तुमच्या कडून जे निर्देश दिले गेले त्याचं सुद्धा आंही पालन करू आमच्या मंडळा कडून कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही असे आम्ही तुम्हाला मंडळाच्या वतीने आश्वासन देतो असे सांगितले.
या प्रसंगी प्रताप मोहिते उत्तम नाकाडी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार,कार्याध्यक्ष सुनिल जाधव, विनायक पवार
अभिषेक नाईक सत्यम नाईक वृषभ मोहिते भरत काळगे, शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अनंत बामणे सरचिटणीस रोहन जाधव सौरभ पवार हर्षल नाईक, महिंद्र पवार निखील पाटील रोहन जाधव संदीप कामुले, राहुल जाधव संजय रेडेकर, विशाल मूचंडी उमेश मेणसें यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.