कर्नाटक व केरळ सीमेवरील दुर्घटना
कर्नाटक व केरळ राज्याच्या सीमेवरील तलपाडी येथे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात सहा जण ठार तर 7 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस स्थानकात घुसून , बसची वाट पाहत उभारलेल्या प्रवाशांना चिरडली.
या दुर्घटनेत एक आटो चालक, एक लहान बाळ, मुलगी व तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी तीन महिला व एका पुरुष चा मृत्यू झाला असून हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
रिक्षा चालक हैदर वय 47, अवम्मा वय 72, खदिजा वय 60, हसन वय 11, नफीसा वय 52, आयशा फिदा वय 19 वर्षे अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. लक्ष्मी वय 61 व सुरेंद्र वय 39 अशी जखमींची नावे आहेत.
केरळच्या कासोरगोड हून मंगळूर कडे येणारी बस ब्रेक फेल झाल्याने धडकल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे.