आपल्या बेळगांवचेच निर्माते असलेल्या आगामी “ऑल इज वेल” या मराठी चित्रपटातील नामवंत कलाकार सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहीत हळदीकर, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अमायरा गोस्वामी तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश जाधव हे तुम्हां सर्वांच्या भेटीसाठी आपल्या बेळगांव नगरीमध्ये येत आहेत.
तरी तुम्ही सर्वांनी मंगळवार, दि. 24 जून 2025 रोजी सकाळी ठीक 09.30 वा. मराठा मंदिर हॉल, गोवावेस, बेळगांव या ठिकाणी आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.
वाणीश्री फिल्म प्रोडक्शन्स, बेळगांव