हिंदू खाटीक समाज तर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बिरदेव मंदिर गणाचारी गल्ली या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रघुनाथ पलंगे, श्री दामोदर भोसले आणि प्रकाश बेळगांवकर याच्या हस्ते 10 वी 12 वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थी
- श्रुती प्रमोद घोडके
- अवधूत सुधीर घोडके
- सिद्धी प्रमोद घोडके
- श्रेया सुभाष काळगेकर
- श्रावणी शिरीष काळगे
- आर्यन गायकवाड
- अमय गायकवाड
- सेजल प्रभावळकर
- प्रणाली शारबिद्रे
- विशांत शारबिद्रे
- कल्याणी शिवाजी घोडके यांचा सत्कार करण्यात आला .
प्रमुख पाहुण्याचा सत्कार अध्यक्ष श्री उदय घोडके यांनी केले तसेच प्रास्ताविक भाषण श्री सागर भोपळे यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन श्री सुधीर घोडके यांनी केले.