कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग असो आयोजित खुल्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2025 मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्स नी सहभाग घेतला होता
22 , आणि 23 जून 2025 या दरम्यान ही स्पर्धा बेंगळुरू येथे आयोजित केली होती 10 जिल्हातून एकूण 150 पेक्षा जास्त स्केटरनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. बेळगावच्या स्केटर्सनी 1 सुवर्ण, 2 रौप्य अशी एकूण 3 पदके या स्पर्ध्ये मध्ये जिंकली
पदक विजेत्या स्केटरचे नाव
मनन आंबिगा 1 सुवर्ण
रश्मिता आंबिगा 2 रौप्य
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, , विठ्ठल गगणे आणि विश्वनाथ येलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका स्केटिंग रिंक,केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून या सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन लाभत आहे.