शांतीनगर, टिळकवाडी व चिदंबरनगर परिसरात चोऱ्या, घरफोड्या केल्याच्या आरोपावरून गोव्यातील एका युवकाला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जमशेदखान खलिलखान (वय ४१) मूळचा राहणारा किंग कोटी, ता. नामपल्ली, जि. हैदराबाद, तेलंगणा, सध्या राहणार आराडी कांदोळी, गोवा असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा
मार्गदर्शनाखाली यांच्या एच. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, प्रभाकर डोळ्ळी, महेश पाटील, एस. एम. करलिंगण्णावर, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, लाडजीसाब मुलतानी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जमशेदखानने टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन व उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक अशा तीन चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याने चोरीनंतर सोन्याचे दागिने वितळून ठेवले होते. त्याच्याजवळून ६० ग्रॅम व ५५ ग्रॅमचे सोने, केए २२ ईक ३०७७ क्रमांकाची होंडा अॅक्टिव्हा व एक मोबाईल असा एकूण १३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे



