बेळगाव (पुढारी वृत्तसेवा): वडगाव येथून तरुणी बेपत्ता झाली आहे. संगीता शंकर मुसळी (वय २०, रा. भुवनेश्वर गल्ली, लक्ष्मीनगर, वडगाव) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. तशी फिर्याद तिची आई सुनीता यांनी शहापूर पोलिसांत दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, २२ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास संगीता ही घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. तिची संगीता मुसळी उंची ५.४ फूट, गोल चेहरा, अंगाने सडपातळ, गव्हाळ रंग आहे. तिला कन्नड भाषा अवगत आहे. या तरुणीबाबत कोणाला माहिती असल्यास शहापूर पोलिसांशी संपर्क (०८३१-२४०५२४४ अथवा ९४८०८०४०४६) साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वडगाव येथून तरुणी बेपत्ता
By Akshata Naik
Previous articleहुतात्मा दिन संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या समितीची बैठक
Next articleपोलीस उपअधीक्षक- निरीक्षकांच्या बदल्या



