राज्यातील १९ पोलीस उपअधीक्षक, ५३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी यांची सीईएन पोलीस स्थानकावर वर्णी लागली असून त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर महांतेश द्यामण्णावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री बदल्यांचा आदेश जारी झाला आहे. हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर यांची कर्नाटक लोकायुक्त विभागात झालेली बदली रद्द करून हुक्केरी पोलीस स्थानकातच त्यांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. रायबागचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर यांना पोलीस उपअधीक्षकपदी बढती देऊन सीसीपीएस खात्यात त्यांची बदली करण्यात आली आहे. तर राज्यातील १९ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. विजापूरचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार यांची बदली कर्नाटक लोकायुक्तमध्ये करण्यात आली आहे.



