बसवन कुडची, बेळगाव येथील गडकिल्ल्यांची भटकंतीचा छंद असलेल्या तरूणांनी नुकतीच चार गडकिल्ल्यांची मोहीम राबविताना महाराष्ट्रातील सर्वात उंच सुप्रसिद्ध कळसुबाई शिखर देखील पादाक्रांत केले.
बसवन कुडची, बेळगाव येथील तरुणांच्या गटाने किल्ले रतनगड, जीवधन, हरिश्चंद्रगड, शिवनेरी अशा गडकिल्ल्यांची मोहीम नुकतीच यशस्वीरित्या राबविली. सदर मोहिमेला गेल्या 15 नोव्हेंबर रोजी बसवन कुडची येथून प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर काल शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च व चित्तथरारक असे कळसूबाई शिखर पादाक्रांत केले. या पद्धतीने कळसुबाई शिखर पादक्रांत करणारे बेळगावातील हे दुसरे तरुण मंडळ ठरले आहे. शिखर पादाक्रांत करण्याच्या मोहिमेत परशराम चौगुले, पुंडलिक एकणेकर, यल्लाप्प्पा मुचंडीकर, सुरज तारिहाळकर, प्रवीण गिरी, नागेश तारिहाळकर, ज्ञानेश्वर तारीहाळकर, पवन तारिहाळकर, सुरज कर्मचारी आदींचा सहभाग होता.