मिलिटरी महादेव समोर काँग्रेस रोडवर दुधाच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला .सदर वाहन खानापुराकडे जात असताना वेगावर नियंत्रण न ठेवता दुचाकी समोर आली आणि रस्त्याच्या मधोमध उलटली.
या अपघातात दुचाकीवरील महिला व बालक गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.
यावेळी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.