येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकार कर्नाटकातील भाजप पक्षातील कार्यकर्ते बजरंग दल तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या सदस्यांना टारगेट करत त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंदवत त्यांची धर पकड करत आहे .
त्यामुळे आज भाजप पक्षाच्या वतीने बेळगाव शहरात काढून काँग्रेस पक्षाचा निषेध केला आणि काँग्रेस सरकार विरोधात मोर्चा काढला.आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आयोधीतील राम मंदिर उद्घाटनाच्या उभारण्यावर असताना गेल्या 30 वर्षांपूर्वी बावरी मशिद पाडविलेल्या घटनेतील संशयित आरोपीला तब्ब्ल तीस वर्षानंतर अटक करण्यात आली आहे.
यामुळे कर्नाटकातील काँग्रेस सरकार विरोधात भाजप पक्षाने रान पेटले आहे. त्यामुळे राजकीय परिस्थिती ढवळली असून या विरोधात भाजप पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटना काँग्रेस सरकार विरोधात मोर्चे काढत आहेत. त्यामुळे आगामी काळात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.