महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या वतीने रविवारी 4 फेब्रुवारीला हुबळी ,कर्नाटक येथे महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण पद्मश्री अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी व श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हुबळीचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत या स्वच्छता अभियानाला सुरुवात होणार आहे. या स्वच्छता अभियानात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील सुमारे वीस हजारहुन आधिक श्री सदस्य सहभागी होणार आहेत. हुबळी शहरातील 152 ठिकाणी या महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 4 फेब्रुवारीला सकाळी सात ते दहा या वेळेत श्री सदस्यांच्या वतीने हे महास्वच्छता अभियान राबविले जाणार आहेत. हुबळी शहरातील गोकुळ रोडवरील लोटस गार्डन येथून स्वच्छता अभियानाला सुरुवात होणार आहे. या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यातून सुमारे वीस हजारहून अधिक श्री सदस्य रविवारी सकाळी हुबळी शहरात दाखल होणार आहेत.
श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून उत्तम समाज घडविण्याचे कार्य करत असताना आपली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मागच्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. यात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप आदी उपक्रमाचा समावेश आहे.