No menu items!
Monday, December 23, 2024

बेळगाव येथील सांबरा धोकादायक वळणावर कारचा अपघात

Must read

धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार गाडी 70 ते 80 फूट फरफट पलटी होत रस्त्या शेजारी असलेल्या शेतात पडल्यामुळे एक महिला जागीच ठार झाल्याची घटना सांबरा गावाजवळ घडली आहे.

हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास घडला आहे. याबाबत मिळालेले माहिती अशी की शुक्रवारी मध्यरात्री भरधाव वेगाने बेळगावहून सांबराकडे कार क्रमांक टी एन 75 झेड 1686 निघाली होती यावेळी कारचालकाचे वळणावर नियंत्रण सुटले.

त्यामुळे कार रस्त्यावरून सुमारे 70 ते 80 फूट फरफटत पलटी होऊन शेतात जाऊन पडली . या अपघातात गाडीतील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे या घटनेची नोंद मारीहाळ पोलीस ठाण्यास करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!