महास्वच्छता अभियानात महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यातील बारा हजार सदस्य झाले होते सहभागी.
डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग, महाराष्ट्र यांच्या वतीने रविवारी 4 फेब्रुवारीला कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या स्वच्छता अभियानात सुमारे 12000 हून अधिक श्री सदस्य सहभागी झाले होते.
निरुपणाच्या माध्यमातून उत्तम समाज घडविण्याचे काम करणाऱ्या डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी व श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला होळीचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, स्थानिक भाजपा आमदार महेश तेंगींकाय, महापौर वीणा भारातद्वाज, तसेच हुबळी शहरातील नगरसेवक, हुबळी धारवाड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र कर्नाटक व राज्यातील 22000 सदस्यांनी संपूर्ण हुबळी शहरात स्वच्छता अभियान राबविले.
यात ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाची सुरुवात हुबळी शहरातील राणी चन्नम्मा सर्कल पासून करण्यात आले होते यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी आता झाडू घेऊन स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
महाराष्ट्र राज्यात डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य फार मोठे असून त्यांच्या श्री सदस्यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. मात्र आज महाराष्ट्रातून हजारो श्री सदस्य कर्नाटक राज्यात दाखल होऊन या हुबळी शहरात स्वच्छता अभियान राबवत आहे हे आमच्यासाठी फार मोठी गौरवाची बाब आहे. प्रतिष्ठानचे कार्य समाजभूमी असून यातून आम्हाला उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.
या स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सांगली, सोलापूर,कोल्हापूर, सातारा तसेच गोवा व कर्नाटक राज्यातील श्री सदस्य विविध वाहनांच्या माध्यमातून रविवारी पहाटे हुबळी शहरात दाखल झाले होते. या स्वच्छता अभियानासाठी केंद्र सरकारच्या वतीने चार विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी स्वच्छता अभियानासाठी लागणारे सर्व सामग्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरविण्यात आली होती.
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमी समाजाभिमुख कार्य करत असून यात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप ,विहीर पुनर्भरण, जलस्वच्छता अभियान, अपंग व गरजूंना साहित्य वाटप, नशा मुक्ती, अज्ञान व साक्षरता अभियान असे अनेक उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविले जातात.