महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सुविधाचा लाभ बेळगाव सह सीमा भागातील मराठी भाषिकांना होत आहे. विशेषतः मुख्यमंत्री सहायता निधी मधून त्याची मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे.बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील रुग्णांना या मदत मिळण्यास अडचणी येत असून कर्नाटक शासनाची आडकाठी येऊ नये याच्या खबरदारीसाठी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या शेवटच्या गाव शिनोळी या ठिकाणी आरोग्य कक्षाची स्थापना करावी.अशी मागणी सीमा समन्व्यक मंत्री शंभूराज देसाई यांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीने निवेदनाद्वारे केली आहे
मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी शनिवारी येथील कार्यालयाची उद्घाटनाची सर्व तयारी झाली होती मात्र अचानक आचारसंहिता लागल्याने हा कार्यक्रम स्थगित करावा लागला होता आता पुन्हा शिनोळी येथे नवीन आरोग्य कक्ष कार्यालय सुरू करावे आणि सीमा भागातील मराठी भाषिकांनी याचा लाभ देण्यासाठी मदत करावी अशी विनंती करण्यात आली आहे
तसेच शिनोळी येथील कार्यालयाच्या उद्घाटना कार्यक्रमाला आपण उपस्थित रहावे अशी विनंती याद्वारे करण्यात आली आहे