चलवेनहट्टी येथे बटाटा लावणी जोमात असून बटाटा लावणीसाठी शेतकऱ्यांचा धावपळ सुरु आहे.आठवड्याभरा पुर्वी पावसाने दमदार हजेरी लावून उघडीप दिल्याने बटाटा लावणीला योग्य हंगाम निर्माण झाले आहे.आडीज ते तीन महिन्यात येणारे हे पिक चलवेनहट्टी,अगसगे हंदिगनूर,
म्हाळेनहट्टी,मण्णीकरे,केदनूर कडोली,बोरकेनहट्टी या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते सध्या लावणीला योग्य हंगाम असल्याने मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे.तसेच सर्वाची लावणी एक बरोबर सुरू झाल्याने परीणामी लावणीसाठी मंजुर मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.तसेच बटाटा लावणीसाठी शेतकऱ्यांना खर्च सुध्दा मोठ्या प्रमाणात येत असतो बियाण बरोबर रासायनिक खतंही महागली आहेत. तसेच पिक जमिनीतून वर आल्यानंतर फळ लागवडीच्या वेळी करपा रोगाला रोखण्यासाठी औषध फवारणी सुध्दा अधिक प्रमाणावर करावी लागते एकंदरीत या पिकासाठी शेतकऱ्यांला खर्च सुध्दा मोठ्या प्रमाणात करावा लागतो. या परीसरात गतवर्षी पेक्षा यंदा बटाटा लावणी योग्य वेळेत होत असल्याने बळीराजा समाधान व्यक्त करत आहे.