बहातभट्टी विकणाऱ्या एकावर उद्यमबाग
पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याच्याकडून साडेचार लिटर दारू जप्त केली. तसेच मारीहाळ पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक आयर्न प्लांट – १ जवळ सार्वजनिक ठिकाणी यल्लाप्पा लगामाप्पा नायक (वय ४६, रा. गुटगुद्दी, ता. हुक्केरी) हा हातभट्टीची दारु विकत होता. उद्यमबागचे उपनिरीक्षक किरण होनकट्टी यांनी ही कारवाई केली. मारीहाळ पोलिसांनी दारू प्रकरणी हणमंत भीमाप्पा तळगेरी (रा. हण्णीकेरी, ता. बैलहोंगल) याच्याविरोधात कारवाई केली.



