महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीनेमंगळावर दिनांक ६ जानेवारी रोजी मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे भव्य सामान्यज्ञान स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेला ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता
स्पर्धेचे उद्घाटन मराठा मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
श्री रमेश पावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन तर प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते सीमाप्रश्नी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. समिती नेते आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुस्कर,मदन बामणे, अप्पासाहेब गुरव, पंढरी परब, अमर येळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, ॲड.सुधीर चव्हाण, वाय.पी.नाईक, महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, जिजामाता महिला बँक अध्यक्षा लता पाटील, भरती किल्लेकर, शिवानी पाटील, विश्वजित हसबे, विलास बेळगावकर, श्रीधर जाधव, उमेश पाटील, प्रशांत पाटील, विकास मांडेकर, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वजन करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आजची गरज ओळखून तसेच सीमाभागातील मराठीचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अशा महत्त्वपूर्ण स्पर्धा भरविल्या बद्दल कौतुक केले.
सीमाभागात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धापरीक्षांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी तसेच शिवरायांचा इतिहास आत्मसाद करण्यासाठी सदर स्पर्धांचे आयोजन होते.
यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष होते तर पूर्वप्रथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालय गटामध्ये 3000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, चिटणीस साईनाथ शिरोडकर,
संतोष कृष्णाचे, सुरज कुडूचकर,अमित देसाई, किरण हुद्दार, विनायक कावळे, आशिष कोचेरि, प्रतीक पाटील, आकाश भेकणे, साईनाथ शिरोडकर, महांतेश अलगोंडी, अजय सुतार, युवराज मुतगेकर रोहन कुंडेकर, जगन्नाथ कुंडेकर, सुरज पाटील, निखिल देसाई, विशाल गौंडाडकर, साईराज जाधव, रोहन कुंडेकर, प्रवीण धामनेकर, सौरभ तोंडले, अक्षय बांबरकर, ओमकार नारळकर, ओमकार चौगुले, आनंद पाटील , शुभम मोरे, अशोक पाटील, वैभव अतीवाडकर, सुरज चव्हाण, विकास भेकणे, जोतिबा पाटील, राकेश सावंत, कुलदीप कानशिडे , यश तारिहाळकर, सागर मुतगेकर, अभिजित अष्टेकर, कर्ण पाटील, रितेश पावले, साक्षी गोरल, प्राजक्ता केसरकर, वैष्णवी चौगुले, वृषाली पाटील, रोहन शेलार, महेश चौगुले, प्रवीण कोराने, पार्थ वाडकर, दर्शन घाटेगस्ती, श्री पाटील, ओमकार मनवाडकर, ओमकार शिंदे, परशराम शिंदे, प्रियांका पाटील, सोनाली लोहार, निकिता चौगुले, ऋतुजा पाटील, ममता चौगुले, शितल सुंठकर, वैष्णवी येतोजी, भावना गडकरी, खुशी कांग्राळकर यांसह बरेच उपस्थित होते
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने भव्य सामान्यज्ञान स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात संपन्न



