निपाणी यरनाळ येथील महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया दीपक पाटील (वय २८) असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतची माहिती अशी, सुप्रिया पाटील यांचे माहेर बेडकीहाळ असून त्या कुटुंबियांसमवेत सांगली येथे राहत होत्या. त्या तीन महिन्यापूर्वी सांगली येथून यरनाळ येथे राहायलाआल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्यांनी घरात ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली
यरनाळ येथे महिलेची आत्महत्या
By Akshata Naik
Previous articleदोन दारू विक्रेत्यांवर कारवाई
Next articleसीमाप्रश्नी आज सुनावणी



