महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी (दि. २७) सुनावणी नियोजित आहे; पण खटला ८०१ व्या क्रमांकावर असल्यामुळे पटलावर येण्याची शक्यता कमी आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारतर्फे
अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात दावा मेन्शन केला होता. त्यानुसार सोमवारी याचिका सुनावणीसाठी नियोजित आहे; पण याचिकेचा क्रमांक ८०१ वा आहे. त्यामुळे तो पटलावर येण्याची शक्यता कमी आहे; पण पुढील सुनावणीची तारीख जाहीर होऊ शकते. २०२३ मध्ये सुनावणी झाली होती. पण, त्यावेळीही कर्नाटकाचे न्यायमूर्ती त्रिसदस्यीय खंडपीठात असल्यामुळे सुनावणी झाली नाही. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी सुनावणी झाली नाही.
महारष्ट्र सरकारने नव्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची कायदा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढ्याचा पाठपुरावा सुरू झाला आहे, असे म. ए. समिती नेत्यांनी सांगितले



