शहरात ठिकठिकाणी गांजा ओढणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला. वडगाव व माळमारुती पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. अन्सार बाबाजान खाजी (वय २८) व अयान शफीउल्ला सौदागर (१८, दोघेही रा. हैदर अली चौक, पिरनवाडी) हे दोघेजण राहत्या चौक परिसरात गांजा ओढत होते. वडगावचे उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व संतोष दळवाई यांनी त्यांना रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला. तर रियान दस्तगीर मोकाशी (२१, रा. न्यू गांधीनगर) हा तरुण न्यू गांधीनगर पहिला क्रॉस परिसरात मादक पदार्थाचे सेवन केल्याचा संशय आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. माळमारुती ठाण्याचे उपनिरीक्षक यु. टी. पाटील यांनी ही कारवाई केली



