देशाची सध्याची आर्थिक व्यवस्था हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 2025-26 साठी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशातील जनतेच्या आशा पल्लवित करणारा आहे. हा अर्थसंकल्प श्रीमंतांसाठी, श्रीमंतांसाठी मांडला आहे.मात्र अंगणवाडी सेविका ,आशा कार्यकर्ता शेतकरी यासह तळागाळातील नागरिकांकरिता अर्थसंकल्प आखण्यात आला नाही त्यामुळे आज सीआयटीयु च्या वतीने बेळगावात तीव्र विरोध करण्यात आला आणि आंदोलन छेडण्यात आले
मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि कमी होणारे वेतन, क्रयशक्तीची तूट यावर उपाय करण्याऐवजी केंद्रातील मोदी सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कष्टकरी जनतेची क्रयशक्ती आणखी खालावली आहे. या अर्थसंकल्पात कष्टकऱ्यांना त्यांच्या कामानुसार मोबदला दिला गेला नाही आणि शेतकऱ्यांच्या पिकांची किंमतही निश्चित केली नाही, हा निराशाजनक अर्थसंकल्प आहे. हा शेतकरी कामगार विरोधी अर्थसंकल्प आहे त्यामुळे याचा निषेध करत मोर्चा काढण्यात आला आणि निवेदन देण्यात आला
आदम