सार्वजनिक शिक्षण खाते व क्रीडा विभागातर्फे बंगळुरु येथे घेण्यात येणाऱ्या 14/17 वर्षा खालील राज्यस्तरीय जंप रोप (स्किपिंग) स्पर्धेत बेळगाव येथील मराठा मंडळ खादरवाडी येथील खेळाडू रवाना झाले आहेत.
8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळूर येथे या स्पर्धा होणार आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेमधे बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करत मराठा मंडळ खादरवाडी शाळेचे विद्यार्थी
स्पर्धेत भाग घेणार आहेत
कु.अनिकेत नागराज नेसरकर
कु.अभिषेक बिरप्पा पाटील
कु.श्रेयस भरमा जाधव
कु.कैफ समियुल धामनेकर
काल रात्री सर्व खेळाडू बंगळूर रवाना झाले तेव्हा रेल्वे स्थानकावर बेळगाव जिल्ह्याचे क्रीडाअधिकारी श्री.जुनेद पटेल सर,क्रीडाशिक्षक अतुल शिरोले,सुभाष गंभीर,इलियास पटेल व पालक इ. यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या.