हलगा महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवाजी चौक येथील शिवमुर्ती आवारात उत्साहात साजरी करण्यात आली.सागर बिळगोजी यांच्या हस्ते शिवमुर्तीला जलाभिषेक घालून पूजन करण्यात आले. यावेळी प्रेरणामंत्र मंत्र म्हणण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय ,जय भवानी जय शिवाजी, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या .यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते