येथील मिलिटरी महादेव मंदिरा नजीक असलेल्या शिवमूर्तीचे शिवजयंती निमित्त पूजन करण्यात आले. यावेळी मराठा लाईट इन्फंट्री आणि जीवन संघर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिटरी महादेव शिवतीर्थ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मराठा लाईट इन्फंट्री चे कॅप्टन गिरीश आणि जीवन संघर्ष फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर गणपत पाटील यांच्या हस्ते शिवमुर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पुष्पहार घालून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी पौरोहित्य मराठा लाईट इन्फंट्री चे पुजारी यांनी केले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय यासह आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमाला माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळ्ळी यांची प्रमुख उपस्थिती होती.