सार्वजनिक ठिकाणी गांजां सेवन करणाऱ्या दोघा जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. या दोघा जणांवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा २७(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गणपती शंकर अरगंजी (वय २८) राहणार माविनकट्टी, ता. बेळगाव व प्रतीक श्रीधर शिंदे (वय २९) राहणार शाहूनगर अशी त्यांची नावे आहेत. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. दप्पादुळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेहरूनगर परिसरात ही कारवाई केली आहे.. अमलीपदार्थविरोधी’ कारवाई गणेशोत्सव व दसरोत्सवाच्या बंदोबस्तामुळे थंडावली होती. पोलिसांनी आता ती पुन्हा सुरू केली आहे. गांजा, पन्नी आदी अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांबरोबरच सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाई सुरू झाली आहे