दड्डी मोहनगा येथील भावेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांनी कालपासून गर्दी केली होती .आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने देवीची ओटी भरण्याकरिता तसेच आपली मागणी पूर्ण करण्याकरिता अनेक भाविक दड्डी मोहनगा येथे दाखल झाले होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोविड मुळे सर्व यात्रा-जत्रा उत्सवांवर निर्बंध आले होते .त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मोहनगा दड्डी यात्रा देखील झाली नव्हती. मात्र आता दोन वर्षानंतर ही यात्रा भरली असल्याने भाविकांनी मंदिर परिसरासह नदीकाठावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.