आज बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी साडेअकरा वाजता अशोक नगर येथील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्टॅंडर्ड च्या 50 बाय 25, 10 लेनच्या जलतरण तलावाचे रीतसर उद्घाटन उतरचे आमदार श्री राजू शेठ यांच्या हस्ते सकाळी साडे अकरा वाजता होणार असून या वेळेला बेळगावचे महापौर श्री मंगेश पवार उपमहापौर सौ वाणी जोशी कार्पोरेशन कमिशनर या सुभा डेप्युटी कमिशनर लक्ष्मी निपाणीकर पोलीस अधिकारी डीसीपी नारायण बर्मनी ओलंपियान व अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री मुकुंद किल्लेकर कर्नाटक राज्य अथलेटिक असोसिएशनचे सेक्रेटरी श्री अशोक शिंत्रे , एन आय एस कोच विश्वास पवार आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतुजा पवार महानगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी, जलतरणपटू पालक व जलतरणप्रेमी उद्या उपस्थित राहणार आहेत असे आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते हे कळवितात. या समारंभासाठी जनतेने उपस्थित रहावे असे आव्हान आबा स्पोर्ट्स क्लब तर्फे करण्यात आले आहे.
हा तलाव सुरू करण्यासाठी पत्रकामध्ये टेंडर साठी जाहीर नोटीस दिली होती आणि हे टेंडर आबा स्पोर्ट्स क्लब ला देण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून महानगरपालिकेतर्फे पुलची डागडुजी आणि नूतनहीकरण करण्याचं काम चालू होतं आणि त्याचबरोबर आबा क्लबचे सर्व मेंबर हा तलाव चालू करण्यासाठी खडपट खात होते आणि अखेर उद्याचा दिवस हा जलतरण तलाव जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल.
अशोक नगर जलतरण तलाव जनतेसाठी सज्ज. उत्तरचे आमदार राजू शेठ यांच्या हस्ते रीतसर आज उद्घाटन
