बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार अरुण यळ्ळूरकर यांची ‘कर्नाटक छायारत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पत्रकार छायाचित्रकार म्हणून अनेक दशकांपासून त्यांनी प्रसारमाध्यम क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय सेवेच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक व्हिडिओ आणि फोटो असोसिएशन (नोंदणीकृत) आणि बायसेल इंटरॅक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७-०६-२०२५ रोजी बंगळुरू येथील अरेमाने मैदानावरील त्रिपुरा वासिनी येथे आयोजित कार्यक्रमात अरुण यळ्ळूरकर यांना ‘कर्नाटक छायारत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला कामगार मंत्री संतोष लाड, आमदार प्रसाद अभय्य, हुबळी फोटो व्हिडिओ असोसिएशनचे अध्यक्ष किरण बाकळे उपस्थित होते.