बेळगावात भरवल्या जाणाऱ्या कर्नाटकी अधिवेशना विरुद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करते, सन 2017 व 2021 ला महामेळावा आयोजित केला म्हणून कर्नाटकी पोलिसांनी समिती नेते व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, या दोन्ही खटल्यांची सुनावणी आज 28 जून रोजी बेळगावच्या जीमेफसी चतुर्थ न्यायालयात पार पडली. मध्यवर्ती महाराष्ट्र समितीचे नेते अध्यक्ष श्री दीपक दळवी हे तब्येतीच्या कारणाने बरेच दिवस झाले न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वारंट जारी केले होते, त्यांचा जामीन अर्ज वकील श्री.महेश बिर्जे यांनी दाखल करून माननीय न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेतला, तसेच श्री.दीपक दळवी यांना न्यायालयात हजर राहता येत नाही म्हणून आज वकील श्री. महेश बिर्जे यांनी दीपक दळवी यांच्या वतीने विनंती अर्ज दाखल केला आहे की, दीपक दळवी यांना तब्बेतीच्या कारणास्तव न्यायायलायत प्रत्यक्ष हजर राहता येत नसल्याने त्यांची कोर्टातील हजेरी ही व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ग्राह्य धरली जावी, यासंदर्भात न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून येत्या 17 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत यावर निर्णय होणार आहे.
दिपक दळवी व समिती कार्यकर्त्यांच्या वतीने ऍड.महेश बिर्जे, ऍड.बाळासाहेब कागणकर, ऍड. एस.बी. बोंद्रे,ऍड.रिचमन रिकी व ऍड. वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत.
या दोन्ही खतल्यामध्ये श्री.दीपक दळवी यांच्यासह मालोजीराव अष्टेकर,मनोहर किनेकर,प्रकाश मरगाळे,नेताजी जाधव,प्रकाश शिरोळकर,शिवाजी सुंठकर,रणजित चव्हाण-पाटील शुभम शेळके,धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, मनोहर हलगेकर,सरिता पाटील,रेणू किल्लेकर,दिलीप बैलूरकर,पीयूष हवळ,सुनील बोकडे,बाबू कोले,आर.एम.चौगुले,अनिल आमरोळे,मदन बामणे,संतोष मंडलिक,दत्ता उघाडे, राकेश पलंगे,सुरज कणबरकर,श्रीकांत कदम,सुरज कुडूचकर,सचिन केळवेकर,बापू भडांगे आदींचा समावेश आहे.