खडेबाजार पोलीस स्थानकातील अधिकारी अ.बी सौदागर उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या 41 वर्षांच्या यशस्वी आणि समर्पित पणे पोलीस दलात सेवा केली आहे, . कॉन्स्टेबल पासून उपनिरीक्षक या 41 वर्षांच्या आपल्या सेवेच्या काळात अनेक आव्हानात्मक परिस्थितींना धैर्याने तोंड दिले. विशेषतः बेळगाव शहरासाठी, दिलेले योगदान खूप मोलाचे आहे.
यांनी आपल्या सेवेच्या काळात अनेक यशोगाथा निर्माण केल्या. त्यांनी महत्त्वाच्या अनेक प्रकरणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या कार्यामुळे समाजाला सुरक्षित आहे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे . 41 वर्षांच्या काळामध्ये बेळगाव मधील खडेबाजार पोलीस स्थानक, मार्केट, माळमारुती, शहापूर पोलीस स्थानकामध्ये त्यांनी सेवा बजावली आहे
आज, सौदागर पोलीस दलातून निवृत्त होत असले तरी, त्यांचे अनुभव आणि ज्ञान समाजासाठी नेहमीच उपयोगी ठरतील. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप बेळगाव केसरी कडून शुभेच्छा
अ.बी सौदागर उपनिरीक्षक म्हणून आज होणार सेवानिवृत्त
