जांबोटी-चोर्ला रस्त्यावर हब्बनहट्टी क्रॉस नजीक ग्रीन हॉटेलच्या नजीक दुचाकी व 407 कॅन्टर टेम्पोमध्ये अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कंटेनर गाडी क्रमांक ( के ए 22 ए ए 9574) चोर्ला मार्गे जांबोटी-बेळगाव कडे जात असलेला टेम्पो चालक विनायक विजय कदम (वय 21 वर्ष) राहणार कुट्टलवाडी तालुका बेळगाव हा निष्काळजीपणे व अति वेगाने टेम्पो चालवून जात असताना, चोर्ला मार्गे गोव्याकडे निष्काळजीपणे अति वेगाने जात असलेल्या दुचाकी क्रमांक (के ए 63 ए एक्स 2459) स्पेलंडर दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने, या अपघातात दर्शन मोहन चव्हाण (वय 20 वर्ष) हा गंभीर जखमी झाला त्यामुळे त्याला उपचारासाठी खानापूरच्या प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्रात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी दुपारी 3.30 वाजता मृत घोषित केले. तसेच दुचाकी च्या पाठीमागे बसलेला राजू कल्लाप्पा शिरपूर याच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात युवक जागीच ठार
