शहरातील किल्ला तलावानजीक असलेल्या एका गादी कारखान्याला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी घडली. गादी कारखान्याला आग लागल्याचे आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी लागलीच अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.
यावेळी अग्निशामक दलाने त्वरीत घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणली. सदर दुर्घटनेत गादी कारखान्यातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.या घटनेची नोंद माळ मारुती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे .