विधान परिषद सदस्य श्री हनुमंत नीराणी यांच्या अनुदानातून भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ च्या वतीने सुळेभावी कन्नड प्राथमिक शाळेला 7 ग्रीन बोर्ड वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी हनुमंत नीराणी बोलताना म्हणाले भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ च्या वतीने अतिशय चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे. मी या उपक्रमाला काही कमी पडल्यास आणखी अनुदान देणार आहे. आम्ही देण्यासाठी समर्थ आहे पण कार्य करणारे कार्यकर्ते जोमाने कार्य करणारे हवे.
आपले कार्यकर्ते ग्रामीण मंडळ मध्ये तर अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवित आहेत. त्याबद्दल भाजपा ग्रामीण मंडळच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो असे म्हूणन उपस्थित कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.
तसेच याप्रसंगी बोलताना ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले की सदर उपक्रमाबाबत बेंगलोर येथे हनुमंत निराणी यांची भेट घेऊन माहिती दिल्यानंतर त्यांना तो आवडला आणि ताबडतोब त्यांनी यासाठी आर्थिक सहाय्य केले. येत्या काही दिवसांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात वेगळे उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने आपण योजना आखत असून ”ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सहाय्य होण्याबरोबरच सरकारी शाळेमध्ये जास्तीत जास्त पटसंख्या वाढावी यासाठी पण आम्ही सर्वजण प्रयत्न करू या” असे उदगार काढले .
या कार्यक्रमाचे उद्घाटन हनुमंत निराणी यांच्या शुभ हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. व्यासपीठावर तालुका शिक्षण अधिकारी आर. बी. जूटनावर, PCO मेदार, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष उदय केसरूर, श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष द्यामन्ना बंगनावर, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मिरजकर, हायस्कूल मुख्याध्यापक एस वाय राजकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव कुमार दोड्डमनी यांनी केले तर बडगे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला गणपती होसमनी, कल्लाप्पा गिरमन्नावर, वकील नवीन होन्निहाळ, तिप्पाजी मोरे, सदानंद गडद, प्रशांत सोगली, शिवाजी अरेर, संजय जाधव आणि SDMC कमिटीच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.