निराधारांना आधार देण्याचे काम जीवन संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.गणपत पाटील यांनी केले आहे.
दावणगिरी येथील एक शिक्षक हिंडलगा सुळगा फॉरेस्ट नाक्याजवळ आढळला. सदर व्यक्ती रस्त्यावर आपले जीवन कंठीत असल्याचे गणपत पाटील यांनी त्या बेघर व्यक्तीला अन्न आणि निवारा देऊन त्याची मदत केली याशिवाय खासबाग येथील निवारा गृहात त्याची रवानगी केली.
डॉक्टर गणपत पाटील यांनी या बेघर व्यक्तिला आधार दिल्याने त्या व्यक्तीने त्यांचे आभार मानले आहेत.तसेच त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करून त्याला खासबाग येथील निवारा गृहात हलविण्यात आले.