ठेकेदार संतोष पाटील यांच्या मृत्युच्या प्रकरणाला उधाण आले आहे. याबाबत पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असतानाच आज केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेते मंडळांनी मयत संतोष पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
मृत संतोषच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी ठेकेदार संतोष यांच्या बडस गावी जाऊन
संतोषच्या कुटुंबियांना पक्षाच्या वतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी यांनीही वैयक्तिकरित्या पाच लाख रुपये सदर कुटुंबाला मदत देऊ केली आहे.
संतोष च्या कुटुंबियांना एकूण सोळा लाखांची आर्थिक मदत आज काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. याआधी संतोषच्या आत्महत्या नंतर लगेच पाटील कुटुंबियांची भेट घेऊन अकरा लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा डीके शिवकुमार यांनी केली होती. त्यानंतर लगेच दोन दिवसात त्यांनी संतोषच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना अकरा लाखाची आर्थिक मदत देऊ केली. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.