आता झालेल्या वादळी पावसाने डॉक्टर बी आर आंबेडकर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटल समोरील एक जुनाट वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडले.यावेळी फुटपाथच्या शेजारी लावलेल्या दुचाकीवर सदर झाड कोसळल्याने जवळपास दहा ते बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे.
तसेच सदर वृक्ष रस्त्यावर देखील पडल्याने येथील मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. जेव्हा झाड उन्मळून पडले त्यावेळी झाडाच्या खाली कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र यात झाड दुचाकीवर पडल्याने वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.