अंगारकी चतुर्थी निमित्त आज शहर परिसरातील गणेश मंदिरांमध्ये गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच मंदिराला आकर्षक आरास करण्यात आली आहे. सकाळपासूनच गणेशाचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली असून मंदिरात मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत.
शहरातील चन्नम्मा सर्कल , हिंडलगा गणपती, कपिलेश्वर मंदिरातील गणेश मंदिर यासह अनेक गणेश मंदिरांमध्ये सकाळी गणेशाला अभिषेक करुन विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
यावेळी मंदिराच्या बाहेर हार फुले नारळ दुर्वाचे यासह अनेक गोष्टीचे स्टॉल लावलेले पहायला मिळत आहेत. काही भाविकांनी सकाळच्या सत्रात दर्शनासाठी गर्दी केली होती. तर सायंकाळी मंदिर परिसरात दर्शनसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.