श्रीराम सेना हिंदुस्तान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी नागरिकांवर अंत्यसंस्कार करणे सोयीस्कर व्हावे त्यांना शेणाच्या गोवऱ्या याकरीता इतरत्र भटकावे लागू नये याकरिता मोलाची मदत केली आहे.
त्यांनी पाच हजार गोवऱ्या सुरेंद्र शिवाजी अनगोळकर यांच्यामार्फत सदाशिवनगर स्मशान भूमी मध्ये देऊ केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
महानगरपालिकेतर्फे तळागाळातील गरीब गरजू नागरिकांना आर्थिक दिलासा देण्याकरिता मोफत अंत्यसंस्काराचा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे याला हातभार म्हणून रमाकांत कोंडुसकर यांनी अंत्यसंस्कारासाठी शेणाच्या 5000 गोवऱ्या देऊ केल्या आहेत.
शहरातील नागरिकांना अशाच प्रकारे मदत करायचे असल्यास त्यांनी सुरेंद्र शिवाजी अनगोळकर यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.