मराठा बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उद्या बसवान गल्ली येथील शाखेत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती मराठा बँके आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मराठा बँकेचे स्थापनेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून बँकेचा नफा आणि तोट्या आणि कार्यक्रमाच्या रूपरेषे विषय पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
सदर अमृतमहोत्सवी सोहळा उद्या सकाळी आठ वाजता सुरु होणार असून या अमृतमहोत्सवी समारंभात सर्व सभासद हितचिंतक आणि समस्त मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.