सध्या मशिदीतून लाऊड स्पीकर होणाऱ्या अजानाला सर्वत्र विरोध होत आहे त्यामुळे अजानविरुद्ध हनुमान चालीसा असा प्रयोग बेळगावात करण्यात आला .यावेळी सोन्या मारुती येथील हनुमान मंदिरात हिंदू संघटनांनी आज अजनच्या वेळेस हनुमान चालीसा पठण करून भजन केले .
यावेळी सकाळी सहाच्या सुमारास सर्व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आरटीओ सर्कल मध्ये उपस्थित राहून अजानच्या वेळी हनुमान चालीसा पठण केले तसेच महाआरती देखील केली.यावेळी डीसीपी रवींद्र गडाडी यांच्या नेतृत्वाखाली सोन्या मारुती मंदिर तसेच शहर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अजान विरुद्ध हनुमान चालीसा असा पहिला प्रयोग बेळगावात पाहायला मिळाला. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात अजन संदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी मंदिरात हनुमान चालीसा पठणाचे आंदोलन हाती घेतल्याचे सांगितले. तसेच लाऊड स्पीकर ची अजान बंद होईपर्यंत या आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याचेही या वेळी बोलताना सांगितले.