प्रत्येक देशाचा कामगार मग तो कोणत्याही स्तरावरचा असू दे, तो त्या देशाचा पाठीचा कणा असतो. हा कणा जर आणखीन सुद्रुड करायचा असेल तर कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे राष्ट्रीय कार्य आहे.असे मत जॉइंट्स चे अध्यक्ष श्री शिव कुमार हिरेमठ यांनी आयोजित उत्कृष्ट कामगार गौरव सत्कार समारंभा प्रसंगी व्यक्त केले.
व्यासपीठावर अध्यक्ष श्री शिवकुमार हिरेमठ, उपाध्यक्ष श्री सुनील मुतगेकर, खजिनदार श्री यल्लाप्पा पाटील, सचिव श्री मुकुंद महागावकर माजी अध्यक्ष श्री संजय पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून वार्ड क्रमांक 16 चे नगरसेवक श्री राजू भातकांडे हे उपस्थित होते.
यावेळी उद्यमबाग परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करणारे सिद्धेश्वर मूकन्नावर, दत्ता रामचंद्र लोहार, श्री मोहन परब, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी मध्ये काम करणाऱ्या श्रीमती गीता ताई पोतदार तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया हिंदवाडी शाखेचे कर्मचारी श्री शंकर जाधव व शिवाजी सप्रे या कर्मचाऱ्यांचा प्रमुख पाहुणे श्री राजू भातखंडे, अध्यक्ष श्री शिव कुमार हिरेमठ, श्री डॉक्टर विनोद गायकवाड व श्री पी आर कदम यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सत्कार मूर्तीनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .प्रमुख पाहुणे श्री राजू भातकांडे यांनी कामगार दिन का करावयाचा असतो व कामगार दिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच याप्रसंगी दमण येथे जायन्ट्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शनला उपस्थित राहिलेल्या जॉइंट्स बंधूंचा देखील येथे सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने जायन्ट्स चे सभासद पदाधिकारी व अन्य आमंत्रित मंडळी उपस्थित होते सूत्रसंचालन सचिव श्री मुकुंद महागावकर यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री सुनील मुतगेकर यांनी केले.